
राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor
राजहंसी मोहोर हे पुण्यातील अग्रगण्य प्रकाशन संस्था राजहंस प्रकाशनाचे अधिकृत मराठी पॉडकास्ट आहे. सात दशकांचा साहित्यिक वारसा लाभलेल्या या उपक्रमात राजहंसी पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा यांचा समावेश आहे. दर बुधवारी नवीन भाग प्रसारित होतो, ज्यामध्ये नवे पुस्तक आणि नवा लेखक सादर केला जातो.
Episodes
शहाणा असशील तर लिहू नकोस...| Lokesh Shevde | Rajhans Prakashan
लोकेश शेवडे लिखित शहाणा असशील तर लिहू नकोस हे पुस्तक नुकतंच राजहंसने प्रकाशित केलंय. या पुस्तकातील एका लेखातील निवडक भागाचं वाचन करताहेत अपर्णा जोग.
पुस्तक खरेदीची लिंक - https://www.rajhansprakashan.com/product-details/shahana-asashil-tar-lihu-nakos-shahanae-asashal-tara
Book - Shahana Asshil Tar Lihu Nakos...
Author - Lokesh Shevde
Narration - Aparna Joag
Cover Design - Veerendra Tikhe
Executi
सुमन कल्याणपूर: सात्विक सुरांचा नंदादीप | Suman Kalyanpur | New Marathi Book
स्त्रीत्व कसं असेल, तिच्या अलवार मनाला काय भावत असेल, तिचं हळुवार व्यक्त होणं कसं असेल, तर सुमनताईंसारखं..! प्रेमळ, समजूतदार, हळवं, शांत, समर्पित... शांतपणे तेवणारा नंदादीपच जणू. कोवळ्या नाजूक फुलांचा मंद सुगंध, पावसाची हलकीशी सर, झाडाची कोवळी पालवी, पानांवरील निर्मळ दवबिंदू किती उपमा द्याव्यात या आवाजाच्या व्यक्तिमत्त्वाला? त्यानं आपलं असं एक स्थान निर्माण केलं. पौर्णिमेच्या शीतल चांदण्याला जर स्
Done That Been There | Meghana Pethe | Marathi Book Narration
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/done-that-been-there-da-thata-bthaara
हे भुयार आहे की विवर हे समजत नाही. आणि दिवा दाखवायला कुणी नाही. आठवणींच्या गच्च रानात हरवल्यावर हाक द्यायला कुणी नाही. मडक्यांची पुन्हा माती होताना कुणीच सोबत नाही. आणि या वाहत्या नदीच्या पाण्याचा ठाव घेता येत नाही. हे नीट उमगल्यावर माणूस स्वतःशी बोलू लागतो का ? आणि हे असं स्वतःशी बोलणंच असतं का लिहि
धुळाक्षरे ते शल्यकौशल्य | Dr Dnyaneshwar Dusane | Marathi Book Review
Book link: https://www.rajhansprakashan.com/product-details/dhulakshare-te-shalyakaushalya-thhalikashhara-ta-shalyakashalya
त्याच्याजवळ ना पैसा होता, ना कुणाचे पाठबळ. हातावरचे पोट असलेले आईवडील अन् गरिबीच्या उन्हात उभे राहिलेले घर. पण तो फक्त नावापुरता 'ज्ञानेश्वर' नव्हता. आपल्या बुद्धिमत्तेला त्याने चिकाटीची धार चढवली. विलक्षण जिद्द अन् अभ्यासाच्या सातत्यातून तो प्रख्यात शल्यविशारद झाला. हा अवघड
हरित हिंदुत्व | Dileep Kulkarni | Rajhans Prakashan
हिंदुत्वा'ची दोन मूलभूत वैशिष्ट्यं म्हणजे आध्यात्मिक जीवनदृष्टी, आणि त्यातून घडणारी संयमित उपभोगाची जीवनशैली. तसं जगणं, म्हणजेच खऱ्या अर्थानं 'धर्मपालन'; कारण, त्यातूनच पर्यावरणाची 'धारणा' सुनिश्चित होऊ शकते. पश्चिमी विचार-आचारांच्या प्रभावामुळे आपणच त्याला सोडचिट्ठी दिलेली आहे! त्यामुळे, साऱ्या जगाप्रमाणेच आपल्यालाही पर्यावरणाच्या विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा काळात, सध्याचं भरकटलेलं
वंचित वर्गाचा अस्वस्थ करणारा उद्गार | काळ्यानिळ्या रेषा | Raju Baviskar | Rajhans Prakashan
‘काळ्यानिळ्या रेषा' हे केवळ एका चित्रकाराचे आत्मकथन नाही, तर हा समाजातील एका वंचित वर्गाचा अस्वस्थ करणारा उद्गार आहे. राजू बाविस्करांनी आधी आपल्या अभिव्यक्तीसाठी रेषा वापरली, रंग वापरले आणि आता आपल्या अनुभवांना शब्दांमधून वाट करून दिली आहे. आपल्या वाट्याला आलेले गावकुसाबाहेरचे उपेक्षेचे जगणे आणि झगडणे समंजसपणे उलगडत ते वाचकांना
आपल्या चित्रांच्या दुखऱ्या मुळांपर्यंत घेऊन जातात. एका सर्जनाची मुळे
नाट्यभारती: ७० वर्षांचा अनोखा प्रवास | Rajhans Prakashan | Natyabharati
नाटक म्हणजे अल्प रंगमंचसज्जा, सशक्त कथानक अन् सामर्थ्यवान भावदर्शी अभिनय यांच्या बळावर प्रेक्षकांना स्वतःचा, आसपासचा आणि व्यापक समाजाचा गंभीर विचार करायला लावणारं एक महत्त्वाचं माध्यम आहे, हे या नाट्यसंस्थेनं आपल्या नाट्यकार्यातून दाखवून दिलं. बृहन्महाराष्ट्रातील मराठी जनांची नाळ आजही मराठी भाषा आणि महाराष्ट्रीय संस्कृतीशी जोडलेली आहे, ही गोष्ट अधोरेखित करणारा इंदौरच्या रंगकर्मीचा सात दशकांचा सर्ज
मेड इन चायना | Girish Kuber | Marathi Book Narration
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/made-in-china-mada-ina-cayanaआपला शेजार आपल्याला बदलता येत नाही. गेली अनेक शतकं आपला शेजारी असलेल्या चीनबरोबरचे आपले संबंध विलक्षण गुंतागुंतीचे. विशेषत: माओंच्या कारकिर्दीत झालेल्या १९६२ च्या
युद्धानंतर हे संबंध चांगलेच ताणले गेले. वास्तविक आजचा चीन आणि माओंचा चीन यात जमीन -
अस्मानाचा फरक. साम्यवादाचं नाव लावणाऱ्या चीनमध्ये आज प्रत्यक्ष
ऑक्सिजन: पर्यावरणाच्या समस्येला भिडणारी भविष्यवेधी कादंबरी
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/oxygen-oikasajana
पृथ्वीवरच्या वातावरणात ऑक्सिजनचं प्रमाण असतं वीस टक्के. हे प्रमाण कायम राखण्यात वनस्पतींचा वाटा महत्त्वाचा. हे प्रमाण घसरू लागलं ! दहा टक्क्यांहूनही खाली घसरलं! आणि जगात एकच हाहाकार माजला. या समस्येवरचा तोडगा काय? तो शोधताना जगातील राष्ट्र दोन गटांत विभागली गेली. पंचेचाळीस प्रगत राष्ट्रांचा तोडगा होता झाडांविना जीवन. तर
दुबई काल आणि आज | Dubai | Marathi Book Review
दुबई म्हणजे वाळवंटात निर्मिलेले जणू नंदनवनच ! जिद्द, मेहनत आणि दुर्दम्य आशावाद या त्रिगुणांच्या जोरावर अरबी माणसाने सर्वस्वी प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. पाण्याच्या चार घोटांसाठी वणवण करणारा हा अरब आज सेंट्रली एअरकंडिशन घरातील सुखासीन आयुष्य जगतोय. हा बदल 'याचि देही याचि डोळा' अनुभवणाऱ्या मेघना अशोक वर्तक. १९७६ ते २०२५ या कालखंडात मेघनाताईंनी आपले पती श्री. अशोक वर्तक यांच्याबरोबर दुबईत वास्तव्य
एका स्थापत्य अभियंत्याची कर्तृत्वगाथा | पाषाणाचे पाझर | Rajhans Prakashan
सत्य हे कल्पनेपेक्षाही अद्भूत असतं याचा प्रत्यय देणारं विलक्षण आत्मचरित्र म्हणजे विवेक गाडगीळ लिखित पाषाणाचे पाझर. हे चरित्र म्हणजे जवळजवळ पाऊणशे वर्षांच्या काळाचे कोलाज आहे! संगमनेरसारख्या छोट्या गावातलं बालपण, नंतर शिक्षणाच्या निमित्तानं गावाबाहेरचं वास्तव्य तर सिव्हिल इंजीनिअर झाल्यावर भारतभर आणि भारताबाहेरही केलेली मुशाफिरी या पुस्तकात आहे. पण हे पुस्तक म्हणजे केवळ अनुभवांचा पट किंवा डायरी लिह
अलौकिक अंटार्क्टिका | Antarctica Travel Story | Rajhans Prakashan
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/antarctia-atarakataka
निसर्गाविषयीचे अपार कुतूहल आणि साहस करण्याची मनाची तयारी या बळावर कोल्हापुरातील एक सुविद्य मध्यमवर्गीय दांपत्य शिडाच्या बोटीतून अंटार्क्टिका मोहिमेवर जाते. एके काळी समुद्रबंदीच्या बेडीने आपल्या समाजाला जखडून ठेवले होते, याचे आज आश्चर्य वाटेल. तो काळ आता मागे पडला आहे. मात्र डॉ. गायत्री आणि डॉ. गुरुदास हर्षे यांनी इत
एक होता कार्व्हर | Veena Gavankar | Rajhans Prakashan
Ek Hota Carver Book Link - https://www.rajhansprakashan.com/product-details/ek-hota-carver-eka-hata-karavahara-dalkasa-aavatata
जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, वीणा गवाणकर आणि राजहंस प्रकाशन यांचं नातं अद्वैत आहे. वीणाताईंच्या अभ्यासू लेखणीतनं साकारलेल्या एक होता कार्व्हर या चरित्रानं मराठी साहित्यात इतिहास रचला. वीणाताईंचं कार्व्हर वाचलं नाही असा रसिक वाचक मिळणं अवघड. १९८१ साली प्रकाशित झालेल्या पहिल्
अफाट विश्वाचा सुबोध परिचय | Dr Girish Pimple | Rajhans Prakashan
आकाश संपते, तिथे सुरू होते अथांग ‘अंतराळ’. या अंतराळात पसरले आहे आपले अफाट विश्व. कोट्यवधी दीर्घिका, अब्जावधी ग्रह-तारे न्युट्रॉन तारे, क्वेसार, कृष्णविवरे अशा अनेक घटकांनी बनलेले हे विश्व. आपण कल्पनाही करू शकणार नाही, अशा चमत्कारांनी अन् घटनांनी भरलेले हे विश्व. या अनंत विश्वांचा वेध घेण्याचा अथक प्रयत्न जगभरचे खगोलशास्त्रज्ञ पिढ्यानपिढ्या करत आहेत. लहानथोरांच्या मनात एकाच वेळी कुतूहल अन् जिज्ञास
घुमक्कडी: कविता महाजन यांचे अखेरचे पुस्तक | Rajhans Prakashan | Marathi Book Narration
Ghumakkadi Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/ghumakkadi
कविता महाजन यांचे 'घुमक्कडी' हे अनोखे पुस्तक नुकतेच राजहंस प्रकाशनाने वाचकांच्या भेटीस आणले आहे. 'ब्र', भिन्न, 'मृगजळीचा मासा' , 'ग्राफिटी वॉल', 'ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम' , 'समुद्रच आहे एक विशाल जाळं' या सारखी गाजलेली पुस्तके कविता यांनी राजहंससाठी लिहिली. 'घुमक्कडी' या पुस्तकात भटकंती आणि त्या-त्या परिसरातील
विश्वास पाटील यांची वास्तवदर्शी महागाथा | Lust for Lalbaug | Vishwas Patil
विश्वास पाटील यांच्या राजहंसी पुस्तकांची लिंक - https://www.rajhansprakashan.com/authors-details/vishwas-patil-vashavasa-patal
आजचा पॉडकास्ट हा खास आहे. कारण ज्येष्ठ साहित्यिक, राजहंसी लेखक, पानिपतकार विश्वास पाटील यांची साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. राजहंस परिवारातर्फे त्यांचं मनापासून अभिनंदन! यानिमित्तानं त्यांच्या लस्ट फॉर लालबाग
..आणि वयाच्या ८९ व्या वर्षी अल्लादियाखां यांनी गाजवली संगीत मैफल
स्वातंत्र्यपूर्व काळात १९४४ साली मुंबईत विक्रमादित्य संगीत परिषद ही भव्य सांगितीक मैफलीचं आयोजन करण्यात आलं होतं. याच्या अध्यक्षस्थानी होते न्यायमूर्ती जयकर. तर या मैफलीची सांगता झालेली उस्ताद अल्लादियाखां यांच्या गायनानं. वास्तविक तेव्हा अल्लादियाखां हे ८९ वर्षांचे होते. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी या परिषदेत सहभागी होण्यासाठी नम्रपणे नकार दिला होता. पण स्वतः बॅरिस्टर जयकर यांनी आग्रह केल्यानं त्
एक अनघड प्रवास उलगडणारं फकिरी | Fakiri | Datta Bargaje | Rajhans Prakashan
खरं तर हा सर्वसामान्य माणूस. चारचौघांसारखंच आयुष्य गेलं असतं त्याचं. बालपण, शिक्षण, मग नोकरी अन् पोटासाठीची पायपीट. पण या प्रवासात त्याला मिळाली सेवेची प्रेरणा, करुणेचा वसा. ती प्रेरणा, तो वसा घेऊन पुढे पीडितांसाठी तो काम करत राहिला. कुठेही थांबला नाही, दमला-भागला नाही, स्वत:च्या सुखाचा विचारही त्याच्या मनात आला नाही. तो निरंतर चालत राहिला. पडल्या-झडलेल्या आणि तुटक्या-फाटक्या माणसाला अडचणीतून मार्
हाडाच्या शिक्षणतज्ज्ञाने शब्दबद्ध केलेले 'माझे शाळेतले प्रयोग' | Smita Gaud | Rajhans Prakashan
गडहिंग्लज तालुक्यातील नांगनूर या छोट्याशा गावातील ‘विद्या मंदिर’ ही प्रयोगांची पहिली पायरी. मुलांमध्ये दडलेल्या उपजत क्षमतांचा विकास घडवणे हे या सा-या प्रयोगांचे लक्ष्य. वर्गात प्रत्यक्ष घडलेली अध्ययन-अध्यापन प्रकिया हा या प्रयोगविषयाचा गाभा. शिकणे आनंददायी व्हावे, शिक्षणातील साचलेपण जाऊन ते निर्झरासारखे प्रवाही व्हावे, या उद्दिष्टाने झपाटलेल्या एका शिक्षणतज्ज्ञाने रेखाटलेला हा अनोखा प्रवास. विद्य
मी...अल्लादियाखां | Mi Alladiyakhan | Ashwini Bhide Deshpande | Marathi Book Podcast
मरहूम उस्ताद अल्लादिया खांसाहेब...जयपूर-अत्रौली घराण्याच्या विद्यमान गायकीचे उद्गाते. जणू ‘गायनाचे गौरीशंकर'! त्यांच्या गायकीच्या आजच्या घडीला कार्यरत वारसदारांपैकी डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे सांगत आहेत त्यांची चरितकहाणी. ख्यालगायनाच्या पद्धतीनुसार ‘रागबढत' किंवा ‘उपज' या अंगाने विस्तारत साकारलेली खांसाहेबांची ही जीवनकथा. त्यातून वाचकापुढे उलगडत जातं कधी सौंदर्यपूर्ण, प्रमाणबध्द स्थापत्यासारखं खांस
दौशाड: दुर्दम्य इच्छाशक्तीचं प्रतीक | Daushad Book | Rajhans Prakashan
Doushad Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/doushad
दुष्काळी भाग. पाण्याचं दुर्भिक्ष्य. हजार अडचणी उभ्या ठाकलेल्या. पण माणदेशातील माणसं हिंमतीनं जगत असतात, कधी मागं हटत नाहीत. आत्महत्येचा वेडा विचार मनात आणत नाहीत.
या माणसांसारखीच एक वेलवर्गीय वनस्पती - ‘दौशाड'! इथल्या माणसासारखी जगणारी, ओढ्याकाठी, खडकावर, वाळूतसुद्धा पाणी नसताना वाढणारी. कितीही दुष्काळ असला; तरी ती दमत, थ
गोष्ट रिझर्व्ह बँकेची | Goshta Reserve Bankechi | Rajhans Prakashan
शेतकर्यांपासून कामगारांपर्यंत, उद्योगपतींपासून गृहिणीपर्यंत, अगदी नोकरदारापासून संतमहंतांपर्यंत प्रत्येकाचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष बँकेशी संबंध येतोच. जशी व्यक्तीची अथवा संस्थेची कुठली ना कुठली बँक, तशी बँकांची बँक, सार्या देशाची बँक म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक. कधी स्थापन झाली ही बँक? कसा झाला या बँकेचा आजवरचा प्रवास? स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात काय होती या बँकेची भूमिका अन् कार्यपद
मृत्यूचा शांत, संयत स्वीकार शक्य आहे? | Sobat Sanjvelchi | Rajhans Prakashan
आपल्यापैकी बहुतेकजण मृत्यूला, विशेषत: वेदनादायी मृत्यूला घाबरतात. परंतु आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असताना ज्यांनी अत्यंत अवघड वाटणारे पर्याय स्वीकारले, अशा सामान्य व्यक्तींच्या, असामान्य जीवनस्पर्शी कथा डॉ. प्रियदर्शिनी कुलकर्णी यांनी अगदी सहज सोप्या भाषेत अन् अत्यंत अनुकंपेने आपल्यासमोर आणल्या आहेत. त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेले प्रसंग, त्यातील गूढता, ताणतणाव आणि त्याचबरोबर दिलासा देणारा हळुवार
शिवचित्रांचा व शिवस्मारकांचा वेधक आढावा | Suhas Bahulkar | Marathi Podcast
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/katha-shivchitranchya-vyatha-shivasmarakachya-katha-cataracaya-vayatha-shavasamarakacaya
भारतीय इतिहासाला निर्णायक राष्ट्रीय वळण लावणारे महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज !
त्यांचे व्यक्तिमत्त्व समाजाला नेहमीच प्रेरणा देत आले. असंख्य चित्रकारांनी छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातले अगणित चित्तथरारक, रोमहर्षक प्रसंग चितारले; तर कित्येक श
कथा शिवचित्रांच्या व्यथा शिवस्मारकांच्या | Suhas Bahulkar | Marathi Book
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/katha-shivchitranchya-vyatha-shivasmarakachya-katha-cataracaya-vayatha-shavasamarakacaya
भारतीय इतिहासाला निर्णायक राष्ट्रीय वळण लावणारे महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज !
त्यांचे व्यक्तिमत्त्व समाजाला नेहमीच प्रेरणा देत आले. असंख्य चित्रकारांनी छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातले अगणित चित्तथरारक, रोमहर्षक प्रसंग चितारले; तर कित्येक श
Inshaallah Novel Review | Abhiram Bhadkamkar | Rajhans Prakashan
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/inshaallah-inashaallha
'दारिद्र्यात पिचत असलेली मुस्लीम वस्ती. पैशाचा अभाव, शिक्षणाचा अभाव! अज्ञान, अस्वच्छता, व्यसनाधीनता यांनी ग्रस्त जीवन. एके दिवशी ती वस्ती ढवळून निघाली. वस्तीतल्या पोरांची धरपकड झाली. जुनैद घरी आलाच नाही, पकडलेल्या पोरांमध्येही तो नव्हता. कॉलेजमध्ये शिकणारा सरळ मुलगा! अभ्यासू, कविताप्रेमी! का झालं असं? का? का? का? त
Manik Varma ani Parivar | Manik Moti | Rajhans Prakashan
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/manik-moti-mani-varma-ani-parivar-manaeka-mata-manaeka-varama-aanae-paravara
‘माणिक वर्मा' असे नाव उच्चारले की, कानामनात रुणझुणू लागतात असंख्य भावगीते, भक्तिगीते अन् नाट्यगीते. शास्त्रीय संगीतातही आपले वेगळे वैशिष्ट्यपूर्ण स्थान त्यांनी निर्माण केले होते. संगीतक्षेत्रात त्यांनी जशी लखलखती कारकीर्द साकारली, तसाच स्वतंत्र ठसा वर्मा कुटुंबा
शोध बदलत्या पृथ्वीचा | Suneet Potnis | Rajhans Prakashan
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/shordh-badaltya-pruthvicha-shathha-bthaltaya-pathavaca
आपल्या पृथ्वीची निर्मिती झाली सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी. जन्मापासून आजपर्यंत तिच्या प्रकृतीत सततचे बदल चालूच आहेत. तिच्या अंतरंगात चाललेल्या प्रचंड घडामोडींचा आणि त्यामुळे तिच्या प्राकृतिक घटकांमध्ये अन् बाह्य रूपामध्ये होणार्या बदलांचा शोध अन् वेध घेणं ही कधीही न संपणारी गोष
राजीव तांबेंच्या भन्नाट मुलांच्या गोष्टी | Rajiv Tambe | Rajhans Prakashan
प्रसिद्ध बालसाहित्यिक राजीव तांबे यांनी खास मुलांसाठी त्यांच्या शैलीत सादर केलेल्या डुकरू, कावळू आणि पालू या गोष्टी तुमच्या घरातल्या बच्चे कंपनीला नक्की ऐकायला द्या! या गोष्टी ऐकून त्यांना उत्सुकता वाटली तर तांबे सरांची पुस्तकंही त्यांना आवर्जून घेऊन द्या.
Author and Narrator: Rajiv Tambe
Content Curator: Mohini Medhekar
Signature Tune: Gandhaar Sangoram
Cover Design: Veerendra Tikhe
Ex
वॉकी टॉकीचा शोध | Rajhans Children Stories
मे महिन्याच्या सुट्टीत राजहंस प्रकाशन खास मुलांसाठी ऑडिओ स्टोरीजचा हा अनोखा खजिना घेऊन आलंय. समाधान शिकेतोड लिखित वॉकीटॉकीचा शोध ही गोष्ट निर्मोह मेढेकर आणि माहिरा रूद्राके यांनी वाचलीय. ही गोष्ट आवडली का हे आम्हाला या गोष्टीला लाईक, कमेंट करून नक्की कळवा! सुट्टीत दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता मुलांनीच मुलांसाठी वाचलेल्या या धमाल गोष्टी रिलीज होणार आहेत.
Book: Jadui Jungle
Author:
Anandachi Phule | Rajhans Children Stories
मे महिन्याच्या सुट्टीत राजहंस प्रकाशन खास मुलांसाठी ऑडिओ स्टोरीजचा हा अनोखा खजिना घेऊन आलंय. संजीवनी बोकील लिखित आनंदाची फुले ही गोष्ट गार्गी वैद्य हिनं वाचलीय. ही गोष्ट आवडली का हे आम्हाला या गोष्टीला लाईक, कमेंट करून नक्की कळवा! सुट्टीत दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता मुलांनीच मुलांसाठी वाचलेल्या या धमाल गोष्टी रिलीज होणार आहेत.
Book: Anandachi Phule
Author: Sanjeevani Bokil
Na
India Arab World Relations beyond Oil
राजहंसी मोहोरच्या या नवीन व्हिडिओ पॉडकास्टमध्ये लेखिका विशाखा पाटील यांच्याशी राजहंस प्रकाशनाचे सल्लागार संपादक प्रशांत दीक्षित यांनी विशेष संवाद साधलाय. धागे अरब जगाचे, कल्चर शॉक - आखाती देश, सावध ऐका आणि जॉर्ज ऑर्वेल अशा उत्तमोत्तम, अभ्यासपूर्ण पुस्तकांच्या लेखिका अशी विशाखा पाटील यांची ओळख आहे. विशाखाताई या बहारिनस्थित असून, आखाती देशांची संस्कृती, समाजकारण, राजकारण यावर त्यांचा सखोल अभ्यास आहे
काजवे - प्रकाशाची फुले | Rekha Majgaonkar | Rajhans Prakashan
मे महिन्याच्या सुट्टीत राजहंस प्रकाशन खास मुलांसाठी ऑडिओ स्टोरीजचा हा अनोखा खजिना घेऊन आलंय. डॉ. संदीप श्रोत्री लिखित काजवे प्रकाशाची फुले हा लेख रेखाताई माजगावकर यांनी वाचलाय. ही लेख आवडला का हे आम्हाला या गोष्टीला लाईक, कमेंट करून नक्की कळवा!
Book: Nisarga Gupite
Author: Dr. Sandeep Shrotri
Narrator: Rekha Majgaonkar
Content Curator: Mohini Medhekar
Signature Tune: Gandhaar S
Picnic | Children Stories | Rajhans Prakashan
मे महिन्याच्या सुट्टीत राजहंस प्रकाशन खास मुलांसाठी ऑडिओ स्टोरीजचा हा अनोखा खजिना घेऊन आलंय. मुग्धा शेवाळकर लिखित पिकनिक ही गोष्ट ईहान रूद्राके यानं वाचलीय. ही गोष्ट आवडली का हे आम्हाला या गोष्टीला लाईक, कमेंट करून नक्की कळवा! सुट्टीत दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता मुलांनीच मुलांसाठी वाचलेल्या या धमाल गोष्टी रिलीज होणार आहेत.
Book: Chotyancha Motha Plan ani Itar Goshti
Author: M
जगणं प्रेमाचं अन् मरणंही | Vaidehi Deshpande | Marathi Book Review
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/jagna-premacha-ani-maranahi-jaganae-paramaca-aanae-maranaeha
'प्रकृतीची काही तक्रार नाही. ना कसली प्रापंचिक वा मानसिक चिंता. आर्थिक अन् सामाजिक दृष्ट्याही उत्तम स्थैर्य. अशा आपल्या समृद्ध, सार्थक जीवनावर स्वेच्छेने मरणशिळा ठेवून मृत्यूचा स्वीकार करणाऱ्या - ‘मरण म्हणजे जीवनाचा नैसर्गिक शेवट आहे याची जाणीव ठेवून त्याच्याकडे धीटपणे वाटचाल क
ससा झाडावर गेलाच कसा | Children Stories | Rajhans Prakashan
मे महिन्याच्या सुट्टीत राजहंस प्रकाशन खास मुलांसाठी ऑडिओ स्टोरीजचा हा अनोखा खजिना घेऊन आलंय. समाधान शिकेतोड लिखित ससा झाडावर गेलाच कसा ही गोष्ट उर्मी दांडेकर हिनं वाचलीय. ही गोष्ट आवडली का हे आम्हाला या गोष्टीला लाईक, कमेंट करून नक्की कळवा! सुट्टीत दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता मुलांनीच मुलांसाठी वाचलेल्या या धमाल गोष्टी रिलीज होणार आहेत.
Book: Jadui Jungle
Author: Samadhan Shi
रोहनचा रविवार | Varsha Gajendragadkar | Children Stories
मे महिन्याच्या सुट्टीत राजहंस प्रकाशन खास मुलांसाठी ऑडिओ स्टोरीजचा हा अनोखा खजिना घेऊन आलंय. वर्षा गजेंद्रगडकर लिखित रोहनचा रविवार ही गोष्ट निर्मोह मेढेकर यानं वाचलीय. ही गोष्ट आवडली का हे आम्हाला या गोष्टीला लाईक, कमेंट करून नक्की कळवा! सुट्टीत दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता मुलांनीच मुलांसाठी वाचलेल्या या धमाल गोष्टी रिलीज होणार आहेत.
Book: Rohancha Ravivar
Author: Varsha Gaje
लैंगिकता संवाद का महत्वाचा? | Dehabhan | Niranjan Medhekar
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/dehabhan-thahabhana
मानवी नात्यांमधला लैंगिकता हा मूलभूत पैलू. आजची तरुणाई त्याकडे कशी बरं बघते? उत्तम सहजीवनासाठी नेमकं काय करायला हवं? विवाहपूर्व लैंगिक समुपदेशन का हवं? सुखी संसाराचं गुपित काय? बदलत्या जीवनशैलीमुळे लैंगिकतेवर परिणाम झाले आहेत का? ते कोणते? त्या समस्यांना कसं तोंड द्यायचं? ज्येष्ठांचं सहजीवन हा दुर्लक्षित राहिलेला विषय
चला पाणी अडवूया | Children Stories | Rajhans Prakashan
मे महिन्याच्या सुट्टीत राजहंस प्रकाशन खास मुलांसाठी ऑडिओ स्टोरीजचा हा अनोखा खजिना घेऊन आलंय. समाधान शिकेतोड लिखित चला पाणी अडवू या ही गोष्ट कनिका भोसले हिनं वाचलीय. ही गोष्ट आवडली का हे आम्हाला या गोष्टीला लाईक, कमेंट करून नक्की कळवा! सुट्टीत दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता मुलांनीच मुलांसाठी वाचलेल्या या धमाल गोष्टी रिलीज होणार आहेत.
Book: Jadui Jungle
Author: Samadhan Shiketod
पेरूची पार्टी | Rajhans Prakashan | Children Stories
मे महिन्याच्या सुट्टीत राजहंस प्रकाशन खास मुलांसाठी ऑडिओ स्टोरीजचा हा अनोखा खजिना घेऊन आलंय. संजीवनी बोकील लिखित पेरूची पार्टी ही गोष्ट आयूष जोशी यानं वाचलीय. ही गोष्ट आवडली का हे आम्हाला या गोष्टीला लाईक, कमेंट करून नक्की कळवा! सुट्टीत दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता मुलांनीच मुलांसाठी वाचलेल्या या धमाल गोष्टी रिलीज होणार आहेत.
Book: Anandachi Phule
Author: Sanjivani Bokil
Nar
चिरतरुण स्वर: आशा भोसले | Asha Bhosale | Rajhans Prakashan
Book link: https://www.rajhansprakashan.com/product-details/chirtarun-swar-asha-bhosale-caratanprnae-savara-aasha-bhasal
आशा भोसले हे नाव आठवण करून देतं, श्रावणातल्या इंद्रधनुष्याची...गाण्याचं असं एकही अंग नाही, ज्याला आशाताईंच्या सुरेल गळ्याचा परिसस्पर्श झाला नाही... या पुस्तकात रसिक संगीत अभ्यासक सुहास किर्लोस्कर आपल्याला घेऊन जातायत आशाताईंच्या गानखजिन्यात! आशाताईंच्या गायनकलेच्या जादूचा परिचय
अबोली | Rajhans Prakashan | Children Stories | Aboli
मे महिन्याच्या सुट्टीत राजहंस प्रकाशन खास मुलांसाठी ऑडिओ स्टोरीजचा हा अनोखा खजिना घेऊन आलंय. मुग्धा शेवाळकर लिखित अबोली ही गोष्ट मीरा दांडेकर हिनं वाचलीय. ही गोष्ट आवडली का हे आम्हाला या गोष्टीला लाईक, कमेंट करून नक्की कळवा! सुट्टीत दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता मुलांनीच मुलांसाठी वाचलेल्या या धमाल गोष्टी रिलीज होणार आहेत.
Book: Chotyancha Motha Plan ani Itar Goshti
Author: Mugdh
कोल्होबाची युक्ती | Rajhans Prakashan | Children Stories
मे महिन्याच्या सुट्टीत राजहंस प्रकाशन खास मुलांसाठी ऑडिओ स्टोरीजचा हा अनोखा खजिना घेऊन आलंय. समाधान शिकेतोड लिखित कोल्होबाची युक्ती ही गोष्ट सहावीतल्या शर्व कुलकर्णी यानं वाचलीय. ही गोष्ट आवडली का हे आम्हाला या गोष्टीला लाईक, कमेंट करून नक्की कळवा! सुट्टीत दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता मुलांनीच मुलांसाठी वाचलेल्या या धमाल गोष्टी रिलीज होणार आहेत.
Book: Jadui Jungle
Author: Samadh
कहाणी एका आधुनिक सुश्रृताची! | Dr Shailesh Puntambekar | Dr Chitralekha Purandare
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/skalpel-te-skopee-te-robo-sakalpal-ta-sakapa-ta-rab
ही कहाणी आहे एका आधुनिक सुश्रृताची. सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या चतुरस्र कार्याची. असंख्य कॅन्सररुग्णांवर यशस्वी उपचार करणारे, जगभरातील अनेक देशांमध्ये जाऊन शल्यचिकित्साविषयक मार्गदर्शन आणि शस्त्रक्रिया करणारे, पुणे टेक्निक हे नवे शल्यतंत्र विकसित करणारे, ख्यातना
छोट्यांचा मोठा प्लॅन | Children Stories Special | Rajhans Prakashan
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/chhotyancha-motha-plan-ani-itar-goshtee-chhatayaca-matha-palna-aanae-itara-gashhata
मे महिन्याच्या सुट्टीत राजहंस प्रकाशन खास मुलांसाठी ऑडिओ स्टोरीजचा हा अनोखा खजिना घेऊन आलंय. मुग्धा शेवाळकर लिखित छोट्यांचा मोठा प्लॅन ही गोष्ट चौथीतल्या गार्गी वैद्य हिनं वाचलीय. ही गोष्ट आवडली का हे आम्हाला या गोष्टीला लाईक, कमेंट करून नक्की कळवा! सुट्ट
भारत पाकवर सर्जिकल स्ट्राईक करेल? | War Against Terrorism | Indo-Pak Situation
२२ एप्रिल २०२५ रोजी अतिरेक्यांनी पहलगाममध्ये २६ पर्यटकांची नृशंस हत्या केल्यावर पाकिस्तानवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैन्यदलांना कारवाईचे दिलेले पूर्णाधिकार तर दुसरीकडे भारत पाकवर हल्ला करणार असल्याचं पक्कं इंटेलिजन्स असल्याचं पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांचं वक्तव्य या सगळ्यातून भारत-पाक युद्ध अटळ आहे की २०१६ आणि २०१९ प्रमाणे भारत पाकिस्तानवर सर्जिकल किंवा एअर
भारतद्वेषाची पाकिस्तानी गोष्ट | Pahalgam Terrorist Attack | Shridhar Loni
पाकिस्तानी लष्करप्रमुख असिम मुनिर यांनी पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याच्या पाचच दिवस आधी अनिवासी पाकिस्तानींसमोर एक मोठं भाषण केलं होतं. त्यात त्यांनी पाकिस्तानची गोष्ट पुढच्या पिढ्यांवर बिंबवण्याचं आवाहन केलं होतं. ही पाकिस्तानी गोष्ट नेमकी काय आहे आणि त्या गोष्टीत सांगितलेली उक्ती दहशतवाद्यांनी पहलगामच्या हल्ल्यात कृतीत उतरवली का, याविषयी सांगताहेत ज्येष्ठ पत्रकार आणि पाकिस्तान का मतलब क्या या पुस्
शेक्सपिअरला आठवताना | World Shakespeare Day Special | Rajhans Prakashan
दरवर्षी २३ एप्रिल हा दिवस जागतिक शेक्सपिअर दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने राजहंस प्रकाशनाचे संपादक आणि शेक्सपिअरच्या साहित्याचे अभ्यासक शिरीष सहस्रबुद्धे यांनी शेक्सपिअरच्या कलाकृतींचे, त्याच्या साहित्याचे केलेले हे सखोल विश्लेषण..
World Shakespeare Day Special Special Guest: Shirish Sahasrabuddhe
Podcast Host: Mohini Medhekar
Signature Tune: Gandhaar Sangoram
Cover Design: Vee
वाचाल तर समृद्ध व्हाल, पण कसं? | World Reading Day Special | Rajhans
In this special episode, author Sanjay Bhaskar Joshi explains why reading is important, how to read, and the abundant benefits of being an avid reader.
World Reading Day Special Episode
Author: Sanjay Bhaskar Joshi
Podcast Host: Niranjan Medhekar
Signature Tune: Gandhaar Sangoram
Cover Design: Veerendra Tikhe
Executive Producer: Mohini Medhekar
Recording: A K Studio
Produced By: R
६४ घरांच्या गोष्टी | Raghunandan Gokhale | Rajhans | Marathi Book Review
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/64-gharanchya-goshtee-gharacaya-gashhata
तुम्हाला बुद्धिबळ खेळायला आवडत असेल, तर तुम्ही या पुस्तकाच्या नक्की प्रेमात पडाल! तुम्हाला बुद्धिबळाबद्दल फारशी जाण नसेल, तर मात्र तुम्ही हे पुस्तक वाचायलाच हवे! बुद्धिबळाच्या इतिहासातील अज्ञात वळणांचा, खेळाडूंच्या अप्रतीम कर्तृत्वाचा, अगदी चित्रपटातून दिसलेल्या बुद्धिबळक्षेत्राचा मागोवा घेत हे पु
शिवरायांचं कार्य कॉर्पोरेटलाही प्रेरणादायी! | Dr. Ajit Apte | Marathi Podcast | Rajhans Prakshan
Book Link : https://www.rajhansprakashan.com/product-details/shree-shivray-set-of-3-books
छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यसंस्थापक होते, मुस्तद्दी राजकारणी होते आणि धुरंधर सेनानी होते. याबरोबरच ते कुशल प्रशासक होते, अर्थतज्ज्ञ होते आणि मानवी संसाधनांची प्रभावी योजना करणारे व्यवस्थापकही होते. शिवरायांच्या कुशल प्रशासनाची, प्रभावी व्यवस्थापनाची आणि यशस्वी अर्थकारणाची अभ्यासू मांडणी म्हणजे डॉ. अजित वाम
समलैंगिकतेचं समग्र चित्रण | Apule Apan | Book Review
Book Review: https://www.rajhansprakashan.com/product-details/apule-apan-aapal-aapanae
आपल्या समाजात काही विषयांवर बोलणं-व्यक्त होणं निषिद्ध समजलं जातं. समलैंगिकता हा असाच एक विषय. समलैंगिकता ही नैसर्गिक आणि अगदी स्वाभाविक गोष्ट असली तरी याविषयी कमालीचं अज्ञान आणि गैरसमज आहेत. जैत लिखित आपुले आपण हे पुस्तक समलैंगिकतेविषयी वास्तवदर्शी विवेचन करतं. या आगळ्यावेगळ्या पुस्तकाविषयी जाणून घेऊया या भागात
Mohemmad Rafi Vishesh | Dr Mrudula Dadhe | Rajhans Prakashan
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/navrasancha-jadugar-mohammad-rafi-navarasaca-jathagara-mahamamatha-rafa
मोहम्मद रफींचं नाव घेतलं अन् त्यांची एकाहून एक सरस नि सुरस गाणी आठवली की सद्गुणांना सुगंधी स्वर लाभला होता असं वाटल्याशिवाय राहत नाही ! पुरुषी स्वर, पण त्याला होती जितकी ऐट तितकीच अदब..प्रेम, छेडछाड, प्रेमभंग, विफलता, उद्वेग, नटखटपणा, शुद्ध भक्ती आणि अशा असंख्य भावछट
नागरिकत्व दुरूस्ती कायद्याची सखोल ओळख | Sheshrao More | Rajhans Prakashan
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/nagarikatva-durustee-kayada-nagarakatava-tharasata-kayatha
आपल्या संविधानाची सुरुवात आम्ही भारताचे लोक अशी आहे. भारतीय नागरिकत्वाचा मूळ कायदा काय आहे तसंच भारताच्या सहा शेजारी देशांमधील ठराविक व्यक्तींना भारताचे नागरिकत्व ज्या कायद्याने मिळू शकते, त्या नवीन कायदा नेमका कसा आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. या कायद्याच्या विविध पैलूंचा
What's the Future of Audio Podcasts in the wave of Video?
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/vishwasamvaad
न्यू मीडिया अर्थात नवीन माध्यमांचा विचार करता पॉडकास्टिंगनं गेल्या चार-पाच वर्षांत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. विश्वसंवाद हा मराठीतला पहिला पॉडकास्ट हा अमेरिकास्थित सॉफ्टवेअर व्यावसायिक मंदार कुलकर्णी यांनी २०१७ मध्ये सुरू केला. गेल्या आठ वर्षांत विश्वसंवाद पॉडकास्टवर येऊन काही पाहुण्यांशी झालेल्या गप्पांवर आधारित
Sonali Kulkarni | Exclusive Podcast | So Cool Take 2 | Marathi Book
Renowned actress and author Sonali Kulkarni talks extensively about her love for writing and how she crafted the book So Cool Take 2 in this special podcast with veteran journalist and editor of her book Alhad Godbole.
So Cool Take 2Book Link - https://www.rajhansprakashan.com/product-details/so-cool-take-2
Author: Sonali Kulkarni
Podcast Host: Alhad Godbole
Signature Tune: Gandhaar Sangoram
Cover
मराठी भाषा गौरव दिन विशेष | Dr. Sadanand Borse | Marathi Podcast
३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ती भाषा किमान दीड ते दोन हजार वर्ष प्राचीन असायला हवी. त्या भाषेत समृद्ध ग्रंथ आणि साहित्य परंपरा असावी. हे साहित्य मूळ त्याच भाषेत लिहिलेलं असावं. अनुवादित नसावं. भाषेचा प्रवास अखंडित असावा आणि प्राचीन व सध्याच्या भाषेतील नातं सुस्पष्ट असावं. असे हे निकष आहेत. या पार्श्वभूमीवर यंदाचा मराठी भाषा गौरव दिन व
पाकिस्तान का मतलब क्या? | Shridhar Loni | Rajhans Prakashan | EP 43
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/pakisthan-ka-matlab-kya-pakasatana-ka-matalb-kaya
पाऊणशे वर्षांचा टप्पा ओलांडल्यानंतरही एखाद्या देशाला आपल्या अस्तित्वाच्या अर्थाचा प्रश्न पडावा का? पण पाकिस्तानला तो पडतोय. ‘पाकिस्तान का मतलब क्या?’ हा प्रश्न आजही तेथे विचारला जातो. उत्तरासाठी इस्लामचा आधार घेतला जातो; मात्र तेथेही उत्तर मिळत नसल्यानं कडवा भारतविरोध जोपासला जातो. धार्मिक
माणूस असा का वागतो? | Anjali Chipalkatti | Marathi Podcast | EP 42
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/manoos-asa-ka-vagato-manaesa-asa-ka-vagata
नैतिकता अन् सामाजिक विषमता, धर्मभावना आणि आध्यात्मिकता, प्रेम अन् लैंगिकता, आक्रमकता अन् भय, अनुपालन, धर्म-जात भेदाभेद, कल्पनाविश्व अन् साहित्य-कला-क्रीडा... माणसाच्या वर्तनाचे असे अनेकविध पैलू. उत्क्रांतिशास्त्र, मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, जेनेटिक्स, मेंदूविज्ञान, मानसविज्ञान, प्राणीवर्तनविज्ञ
Madhav Gadgil Vishesh | Part 2 | Rajhans Prakashan | EP 41
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/sahyachala-ani-mee-sahayacal-aanae-ma-eka-paramakahanae
पद्मभूषण माधव गाडगीळ यांच्याशी शास्त्रज्ञ-संशोधन डॉ. मंदार दातार हे संवाद साधताहेत. निमित्त आहे संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक विभागानं नुकतंच Champions of The Earth या पुरस्कारानं माधव गाडगीळ सरांना सन्मानीत केलंय. या विशेष भागाचा हा उत्तरार्ध..
Book: Suranchi Samradnyi Lata Ma
Madhav Gadgil Vishesh | Special Interaction | Rajhans Prakashan | EP 40
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/sahyachala-ani-mee-sahayacal-aanae-ma-eka-paramakahanae
पद्मभूषण माधव गाडगीळ म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व! निसर्गप्रेम हा माधव गाडगीळांचा श्वास अन् ध्यास. गेल्या पाच तपांचे सखोल संशोधन, भारतातील निसर्गाची अन् जीवशास्त्राची अद्भुत कोडी सोडवणारा प्रदीर्घ व्यासंग आणि सामान्यातल्या सामान्य माणसाप्रति मानत असलेले उत्तरदायित्व या साऱ्यांचे
Lata Mangeshkar Vishesh | Dr. Mrudula Dadhe | Rajhans Prakashan
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/suranchi-samaradnee-lata-mangeshkar-saraca-samarajania-lta-magashakara
संगीत हे परमेश्वरापर्यंत पोहोचायचं साधन असेल, तर त्या प्रवासाला स्वत:च्या आवाजाचा मखमली रस्ता दिला, तो लताबाईंनी. राग, अनुराग, प्रणय, मीलन, विरह, रुसवा, वंचना, निराशा, पश्चाताप, वात्सल्य, हर्ष, खेद... अशा अनंत भावछटांना लताच्या आवाजानं मूर्तरूप दिलं. या दैवी आवाजाची ना
धरणसूक्त | Award Winning Novel | Marathi Podcast
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/dharansukta-thharanaesakata
एखादा धरणप्रकल्प साकार होताना नेमकं काय घडतं? त्या ठिकाणी तज्ज्ञ इंजिनियरांपासून रोजंदारीवरच्या मजुरापर्यंत शेकडो माणसं कसा हातभार लावतात? या सगळ्यांच्या एकत्र जगण्यातून कोणतं जीवननाट्य उलगडत जातं? विस्थापितांना कोणत्या मरणयातनांना सामोरं जावं लागतं? धरणउभारणीत किती व्यामिश्र तांत्रिक बाबी गुंतलेल्या असतात? एका
साठवणीतील गाणी | Mohammad Rafi | Kishore Kumar | Lata Mangeshkar | Asha Bhosale
Book Set Link: https://www.rajhansprakashan.com/book-store
स्वातंत्र्योत्तर काळात हिंदी चित्रपटसृष्टीचं जे सुवर्णयुग अवतरलं त्यात चित्रपटसंगीताचा मोलाचा वाटा होता. या सुवर्णकाळातील चार लखलखती नक्षत्र म्हणजे लता मंगेशकर, मोहम्मद रफ़ी, आशा भोसले आणि किशोर कुमार. या चार गायकांच्या कारकीर्दीचा आढावा घेत त्यांनी गायलेल्या हज़ारो गाण्यांपैकी प्रत्येकी २५ गाण्यांचा रसास्वाद घेणारी सुहास किर्लोस्कर आणि डॉ
36. Kishor Kumar Life Journey and Songs | Suhas Kirloskar | Marathi Podcast
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/aawajacha-awaliya-kishor-kumar-aavajaca-avalya-kashara-kamara
हिंदी चित्रपटसृष्टीतलं उत्स्फूर्त संगीताचा आविष्कार असणारं हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणजे किशोर कुमार. एक मनस्वी हळवा माणूस लपला होता त्याच्यात.
‘आ चल के तुझे मैं ले के चलूं’ गाण्याचा गीतकार किशोर...‘कोई हमदम न रहा’ गाण्याचा संगीतकार होता.
‘मैं हुं झुम झुम झुमरू’ गाणारा किशोर..
35. ऐवज विचारांचा | स. ह. देशपांडे जन्मशताब्दी विशेष | Rajhans Prakashan | Marathi Podcast
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/aiwaj-vicharancha-aivaja-vacaraca
भोवतालच्या समाजाचे आणि सामाजिक परिस्थितीचे एका समाजशास्त्रज्ञाच्या चश्म्यातून सतत आकलन करून घेणारे प्रा. स. ह. देशपांडे हे वैचारिक महाराष्ट्राला परिचित असणारे एक नाव. प्राध्यापक देशपांडे यांनी पाच दशकांहूनही अधिक काळ विपुल लेखन केले आणि महाराष्ट्राच्या विचार-विश्वावर एक विशिष्ट ठसा उमटवला. राष्ट्रवाद या व
34. शह आणि काटशह | Dr Rajeev Joshi | Dr Shreeram Geet | Book Reivew
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/shah-ani-katahah-shaha-aanae-katashaha
वैद्यकीय क्षेत्र हे त्यातल्या कामच्या तासांमुळे, इमरजन्सी केसेसमुळे कमालीचं धकाधकीचं तर असतंच पण ते तितकंच स्पर्धेचं आणि चुरशीचंही असतं. ही चुरस वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवण्यापासूनच सुरू होते. डॉ. राजीव जोशी लिखित शह काटशह हे पुस्तक १९८७ साली घडलेली अशीच एक सत्यकथा उलगडते. ही कथा आहे वैद्यक
33. गाता रहे | Book Reivew | Suhas Kirloskar | Marathi Podcast
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/gata-rahe-gata-raha
संगीत मग ते जुने असो वा नवे, शास्त्रीय-उपशास्त्रीय असो वा चित्रपटसंगीत ते आवडीनं ऐकणारे आपल्यासह आजूबाजूला अनेकजण दिसतात. पण गीताचा-संगीताचा आस्वाद घेत आपण खरंच ते ऐकतो का? काय म्हणता? हा आस्वाद नेमका कसा घ्यायचा? सुहास किर्लोस्कर लिखित गाता रहे हे पुस्तक चित्रपटसंगीताची अन् वाद्यसंगीताच्या आस्वादाची अनोखी मैफील साकारत
32. नंदीघोष यात्रा - श्रीकृष्णकथा: वेध नवा | Satish Mutatkar | Yashwant Marathe | Rajhans Prakashan
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/nandighosh-yatra-nathaghashha-yatara-sharakashhanaekatha-vathha-nava
कृष्ण हे कालातीत प्रेरणास्थान आहे. त्याच्या तत्वज्ञानाची ओळख करून देणारं नंदीघोष यात्रा श्रीकृष्णकथा वेध नवा हे पुस्तक हे नुकतंच दाखल झालं आहे. हे पुस्तक सतीश मुटाटकर आणि यशवंत मराठे यांनी लिहिलं असून पुस्तकाचा अनुवाद डॉ. शुचिता नांदापूरकर फडके यांनी केला आहे.
Book: Nan
31. पुनश्च हनिमून | Sandesh Kulkarni | Amruta Subhash | Marathi Podcast
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/punashcha-honeymoon-panashaca-hanamana
ही गोष्ट आहे सुहास आणि सुकन्याची. त्यांच्या पहिल्या लग्नाच्या दुसऱ्या हनिमूनची. पण लग्नानंतर सात वर्षांनी माथेरानला त्याच हॉटेलमध्ये पोचल्यावर बरंच काही विस्कटलंय ही जाणीव त्यांना अस्वस्थ करतीय. पण नकळत उसवत चाललेल्या नात्याची ही गोष्ट फक्त त्या दोघांची रहात नाही. पस्तिशी-चाळीशीतल्या अनेक जोडप्यांच्य
30. पं. जितेंद्र अभिषेकी यांचा जीवनप्रवास | Abhisheki | Rajhans Prakashan
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/abhishekee-pandit-jitendra-abhisheki-abhashhaka-padata-jatathara-abhashhaka
पं. जितेंद्र अभिषेकी. शिष्य, मैफलगायक, संगीतकार आणि गुरू ही त्यांची संगीतविश्वातील चार रूपं. स्वत:च स्वत:च्या तत्त्वांशी, ध्येयांशी, उद्दिष्टांशी स्पर्धा करत पराकोटीच्या तन्मयतेनं एकाच
वेळी साकारलेल्या या चार भूमिका! त्यात आपण अव्वलच असलं पाहिजे, ही त्यांची आंतरि
29. पृथ्वी धुंडाळणाऱ्या शोधनायकांची गाथा! | Vasundhareche Shodhyatri | Marathi Podcast
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/vasundhareche-shodhayatri-vasathharaca-shathhayatara
प्रवास करायला उमेद हवी हे खरं असलं तरी अज्ञात प्रदेशांची मुलुखगिरी करायची म्हणलं तर या उमेदीला साहसाचीही जोड हवी. गेल्या दोन हजार वर्षांतील पृथ्वी धुंडाळणाऱ्या अशा असंख्य शोधनायकांची गाथा डॉ. अनुराग श्रीकांत लव्हेकर यांचं वसुंधरेचे शोधयात्री हे पुस्तक उलगडतं. या आगळ्यावेगळ्या ग्रंथाविषय
28. आपण एका टकमक टोकाकडे चाललोय? | Atul Deulgaonkar | Nisargakallol
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/nisargakallol-nasaragakallli
कुठे कोरडा दुष्काळ, तर कुठे ओला. कुठे ढगफुटी, तर कुठे अवकाळी गारपीट. एकीकडे वारंवार वणवे, तर दुसरीकडे महापूर. सर्वत्र चर्चा एकच: हवामान कल्लोळ! यात दोष कुणाचा? निसर्गाचा नक्कीच नाही. माणसानं निसर्गाची हत्या चालवली आहे. पण निसर्गाची हत्या म्हणजे माणसाची आत्महत्या. कशी, ते सांगणारं निसर्गकल्लोळ हे पुस्तक घेऊन ले
27. वस्त्र परंपरेचा अनमोल ठेवा | Vastragatha | Vinay Narkar
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/vastragatha-vasataragatha
अन्न-वस्त्र-निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा. कुतूहल ही नैसर्गिक प्रेरणा आणि बुद्धिमत्तेची नैसर्गिक देणगी यांच्या बळावर माणसाने अनेक गोष्टींमागच्या शास्त्राचा शोध घेतला अन् कलात्मक सौंदर्याविष्कार घडवले. कापसासारख्या वनस्पतिज अन् रेशमासारख्या प्राणिज पदार्थांच्या तंतूंच्या धाग्यांपासून मागावर वस्त्र विणणे; त्याला
26. दंव भिजली वही | Himanshu Kulkarni | Marathi Poetry
कवितासंग्रहाची लिंक - https://www.rajhansprakashan.com/product-details/davbhijaleee-vahee-thava-bhajal-vaha
"फुलांनी बहरलेली नाजूक डहाळी वा-याच्या झुळकीने चांदण्यात थरथरावी, तसेच काहीसे श्री. हिमांशु कुलकर्णी यांची कविता वाचताना मला सतत जाणवत राहिले. अतिशय संवेदनशील मनाचा तो उत्कृष्ट आणि कोमल आविष्कार आहे. स्वत:कडे लक्ष आकर्षून घेण्यासाठी या कवितेला कसलीही नवी टूम लपेटून घेण्याची जरुरी वाटत नाही.
25. आनंदाच्या दाही दिशा: मुक्त मुशाफिरी | Dr. Aarati Ranade | Marathi Podcast
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/anandachya-dahee-disha-aanathacaya-thaha-thasha
ही आहे मुक्त मुशाफिरी..... नानाविध प्रदेशांची, भौगोलिक, तसेच मानसिकही. कधी पर्वतशिखरे आणि खोल द-यांत निसर्गाच्या विराट रूपांचा आनंद घेण्यासाठी केलेली, तर कधी स्टेमसेल्स, संप्रेरके आणि विकरे, या निसर्गाच्याच सूक्ष्मतम रूपांत बौध्दिक आनंद मिळवण्यासाठी केलेली. कधी शरीराची ताकद आजमावण्यासाठी, तर
24. विशेष संवाद: चंद्रकांत कुलकर्णी | उत्तरार्ध | Chandrakant Kulkarni | Marathi Podcast
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/chandrakant-kulkarni-saadar-karait-ahe-catharakata-kalkaranae-sathara-karata-aaha
प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासोबतच्या विशेष संवादाचा हा उत्तरार्ध..
कवीनं असावं अल्पाक्षरी, आणि नाटककारानं मितभाषी. अभिनेत्यानं करावा संहितेतील अव्यक्त आशय व्यक्त. तंत्रज्ञानं साधावा शब्देविण संवाद. ध्वनी, प्रकाश, रंग, रेषा यांनी टाका
23. चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे...| Director Chandrakant Kulkarni | Marathi Podcast
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/chandrakant-kulkarni-saadar-karait-ahe-catharakata-kalkaranae-sathara-karata-aaha
कवीनं असावं अल्पाक्षरी, आणि नाटककारानं मितभाषी. अभिनेत्यानं करावा संहितेतील अव्यक्त आशय व्यक्त. तंत्रज्ञानं साधावा शब्देविण संवाद. ध्वनी, प्रकाश, रंग, रेषा यांनी टाकावा अवकाश भारून. प्रेक्षकांनी सगळं अनुभवावं, मूक राहून आणि एकाग्र होऊन. समीक्षकांनी करावं नाट
22. द सिक्रेट मिशन: एका अद्भुत रहस्याच्या मागावर... | Marathi Podcast | Rajhans Prakahsan
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/the-secret-mission-tha-sakarata-mashana
मराठी साहित्यात रहस्य कथांचा वाचकवर्ग खूप मोठा आहे. आजही रहस्यकथा मोठ्या आवडीनं वाचल्या जातात. रहस्य कथाकार बाबुराव अर्नाळकर आणि गुरूनाथ नाईक यांच्या सन्मानार्थ राजहंस प्रकाशनानं घेतलेल्या रहस्य सन्मान कादंबरी स्पर्धेतली द्वितीय क्रमांक विजेती कादंबरी म्हणजे 'द सिक्रेट मिशन'. या अनोख्या कादंबरीविषयी
21. चंद्रशेखर: जसं जगलो तसं | Chandrashekhar | Marathi Podcast
Chandrashekhar Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/chandrashekhar-catharashakhara-jasa-jagal-tasa
१९९० च्या दशकात वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांनी आणि सीमा प्रश्नांनीही देश धुमसत असताना १० नोव्हेंबर १९९० रोजी चंद्रशेखर यांनी देशाचे आठवे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली. चंद्रशेखर यांच्याविषयी आजच्या पिढीला विशेष माहिती नाही. समाजवादी विचारसरणीच्या मुशीत घडलेल्या, आणीबाणीत तु
Recommended

Julius Manuel

Welted Marigold | Desi Crime & Indian True Crime Stories

The Sandip Roy Show

The Expressions Podcast

The Indian AvGeek

RJ Mano - Tamil Self Improvement / Self Help/Self Care Motivational Wellness Podcast

Pahayan Talks - Malayalam Podcast

द अचीवर्स टॉक

🎙️ Audit by Neeraj

Sindhi Sanskriti with Tamana and Meena : Sindhi Samaj Podcast

Theology ki Baath

Candid Confessions With Chhavi