Home Podcasts राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor
राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor

राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor

Rajhans Prakashan 101 Episodes Apr 15, 2026

राजहंसी मोहोर हे पुण्यातील अग्रगण्य प्रकाशन संस्था राजहंस प्रकाशनाचे अधिकृत मराठी पॉडकास्ट आहे. सात दशकांचा साहित्यिक वारसा लाभलेल्या या उपक्रमात राजहंसी पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा यांचा समावेश आहे. दर बुधवारी नवीन भाग प्रसारित होतो, ज्यामध्ये नवे पुस्तक आणि नवा लेखक सादर केला जातो.

Episodes

शहाणा असशील तर लिहू नकोस...| Lokesh Shevde | Rajhans Prakashan Apr 15, 2026 523 लोकेश शेवडे लिखित शहाणा असशील तर लिहू नकोस हे पुस्तक नुकतंच राजहंसने प्रकाशित केलंय. या पुस्तकातील एका लेखातील निवडक भागाचं वाचन करताहेत अपर्णा जोग. पुस्तक खरेदीची लिंक - https://www.rajhansprakashan.com/product-details/shahana-asashil-tar-lihu-nakos-shahanae-asashal-tara Book - Shahana Asshil Tar Lihu Nakos... Author - Lokesh Shevde Narration - Aparna Joag Cover Design - Veerendra Tikhe Executi
सुमन कल्याणपूर: सात्विक सुरांचा नंदादीप | Suman Kalyanpur | New Marathi Book Mar 4, 2026 2044 स्त्रीत्व कसं असेल, तिच्या अलवार मनाला काय भावत असेल, तिचं हळुवार व्यक्त होणं कसं असेल, तर सुमनताईंसारखं..! प्रेमळ, समजूतदार, हळवं, शांत, समर्पित... शांतपणे तेवणारा नंदादीपच जणू. कोवळ्या नाजूक फुलांचा मंद सुगंध, पावसाची हलकीशी सर, झाडाची कोवळी पालवी, पानांवरील निर्मळ दवबिंदू किती उपमा द्याव्यात या आवाजाच्या व्यक्तिमत्त्वाला? त्यानं आपलं असं एक स्थान निर्माण केलं. पौर्णिमेच्या शीतल चांदण्याला जर स्
Done That Been There | Meghana Pethe | Marathi Book Narration Feb 25, 2026 946 Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/done-that-been-there-da-thata-bthaara हे भुयार आहे की विवर हे समजत नाही. आणि दिवा दाखवायला कुणी नाही. आठवणींच्या गच्च रानात हरवल्यावर हाक द्यायला कुणी नाही. मडक्यांची पुन्हा माती होताना कुणीच सोबत नाही. आणि या वाहत्या नदीच्या पाण्याचा ठाव घेता येत नाही. हे नीट उमगल्यावर माणूस स्वतःशी बोलू लागतो का ? आणि हे असं स्वतःशी बोलणंच असतं का लिहि
धुळाक्षरे ते शल्यकौशल्य | Dr Dnyaneshwar Dusane | Marathi Book Review Feb 4, 2026 1566 Book link: https://www.rajhansprakashan.com/product-details/dhulakshare-te-shalyakaushalya-thhalikashhara-ta-shalyakashalya त्याच्याजवळ ना पैसा होता, ना कुणाचे पाठबळ. हातावरचे पोट असलेले आईवडील अन् गरिबीच्या उन्हात उभे राहिलेले घर. पण तो फक्त नावापुरता 'ज्ञानेश्वर' नव्हता. आपल्या बुद्धिमत्तेला त्याने चिकाटीची धार चढवली. विलक्षण जिद्द अन् अभ्यासाच्या सातत्यातून तो प्रख्यात शल्यविशारद झाला. हा अवघड
हरित हिंदुत्व | Dileep Kulkarni | Rajhans Prakashan Jan 21, 2026 1016 हिंदुत्वा'ची दोन मूलभूत वैशिष्ट्यं म्हणजे आध्यात्मिक जीवनदृष्टी, आणि त्यातून घडणारी संयमित उपभोगाची जीवनशैली. तसं जगणं, म्हणजेच खऱ्या अर्थानं 'धर्मपालन'; कारण, त्यातूनच पर्यावरणाची 'धारणा' सुनिश्चित होऊ शकते. पश्चिमी विचार-आचारांच्या प्रभावामुळे आपणच त्याला सोडचिट्ठी दिलेली आहे! त्यामुळे, साऱ्या जगाप्रमाणेच आपल्यालाही पर्यावरणाच्या विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा काळात, सध्याचं भरकटलेलं
वंचित वर्गाचा अस्वस्थ करणारा उद्गार | काळ्यानिळ्या रेषा | Raju Baviskar | Rajhans Prakashan Jan 14, 2026 2244 ‘काळ्यानिळ्या रेषा' हे केवळ एका चित्रकाराचे आत्मकथन नाही, तर हा समाजातील एका वंचित वर्गाचा अस्वस्थ करणारा उद्गार आहे. राजू बाविस्करांनी आधी आपल्या अभिव्यक्तीसाठी रेषा वापरली, रंग वापरले आणि आता आपल्या अनुभवांना शब्दांमधून वाट करून दिली आहे. आपल्या वाट्याला आलेले गावकुसाबाहेरचे उपेक्षेचे जगणे आणि झगडणे समंजसपणे उलगडत ते वाचकांना आपल्या चित्रांच्या दुखऱ्या मुळांपर्यंत घेऊन जातात. एका सर्जनाची मुळे
नाट्यभारती: ७० वर्षांचा अनोखा प्रवास | Rajhans Prakashan | Natyabharati Dec 24, 2025 2145 नाटक म्हणजे अल्प रंगमंचसज्जा, सशक्त कथानक अन् सामर्थ्यवान भावदर्शी अभिनय यांच्या बळावर प्रेक्षकांना स्वतःचा, आसपासचा आणि व्यापक समाजाचा गंभीर विचार करायला लावणारं एक महत्त्वाचं माध्यम आहे, हे या नाट्यसंस्थेनं आपल्या नाट्यकार्यातून दाखवून दिलं. बृहन्महाराष्ट्रातील मराठी जनांची नाळ आजही मराठी भाषा आणि महाराष्ट्रीय संस्कृतीशी जोडलेली आहे, ही गोष्ट अधोरेखित करणारा इंदौरच्या रंगकर्मीचा सात दशकांचा सर्ज
मेड इन चायना | Girish Kuber | Marathi Book Narration Dec 10, 2025 649 Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/made-in-china-mada-ina-cayanaआपला शेजार आपल्याला बदलता येत नाही. गेली अनेक शतकं आपला शेजारी असलेल्या चीनबरोबरचे आपले संबंध विलक्षण गुंतागुंतीचे. विशेषत: माओंच्या कारकिर्दीत झालेल्या १९६२ च्या युद्धानंतर हे संबंध चांगलेच ताणले गेले. वास्तविक आजचा चीन आणि माओंचा चीन यात जमीन - अस्मानाचा फरक. साम्यवादाचं नाव लावणाऱ्या चीनमध्ये आज प्रत्यक्ष
ऑक्सिजन: पर्यावरणाच्या समस्येला भिडणारी भविष्यवेधी कादंबरी Dec 3, 2025 708 Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/oxygen-oikasajana पृथ्वीवरच्या वातावरणात ऑक्सिजनचं प्रमाण असतं वीस टक्के. हे प्रमाण कायम राखण्यात वनस्पतींचा वाटा महत्त्वाचा. हे प्रमाण घसरू लागलं ! दहा टक्क्यांहूनही खाली घसरलं! आणि जगात एकच हाहाकार माजला. या समस्येवरचा तोडगा काय? तो शोधताना जगातील राष्ट्र दोन गटांत विभागली गेली. पंचेचाळीस प्रगत राष्ट्रांचा तोडगा होता झाडांविना जीवन. तर
दुबई काल आणि आज | Dubai | Marathi Book Review Nov 5, 2025 939 दुबई म्हणजे वाळवंटात निर्मिलेले जणू नंदनवनच ! जिद्द, मेहनत आणि दुर्दम्य आशावाद या त्रिगुणांच्या जोरावर अरबी माणसाने सर्वस्वी प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. पाण्याच्या चार घोटांसाठी वणवण करणारा हा अरब आज सेंट्रली एअरकंडिशन घरातील सुखासीन आयुष्य जगतोय. हा बदल 'याचि देही याचि डोळा' अनुभवणाऱ्या मेघना अशोक वर्तक. १९७६ ते २०२५ या कालखंडात मेघनाताईंनी आपले पती श्री. अशोक वर्तक यांच्याबरोबर दुबईत वास्तव्य
एका स्थापत्य अभियंत्याची कर्तृत्वगाथा | पाषाणाचे पाझर | Rajhans Prakashan Oct 29, 2025 2316 सत्य हे कल्पनेपेक्षाही अद्भूत असतं याचा प्रत्यय देणारं विलक्षण आत्मचरित्र म्हणजे विवेक गाडगीळ लिखित पाषाणाचे पाझर. हे चरित्र म्हणजे जवळजवळ पाऊणशे वर्षांच्या काळाचे कोलाज आहे! संगमनेरसारख्या छोट्या गावातलं बालपण, नंतर शिक्षणाच्या निमित्तानं गावाबाहेरचं वास्तव्य तर सिव्हिल इंजीनिअर झाल्यावर भारतभर आणि भारताबाहेरही केलेली मुशाफिरी या पुस्तकात आहे. पण हे पुस्तक म्हणजे केवळ अनुभवांचा पट किंवा डायरी लिह
अलौकिक अंटार्क्टिका | Antarctica Travel Story | Rajhans Prakashan Oct 15, 2025 804 Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/antarctia-atarakataka निसर्गाविषयीचे अपार कुतूहल आणि साहस करण्याची मनाची तयारी या बळावर कोल्हापुरातील एक सुविद्य मध्यमवर्गीय दांपत्य शिडाच्या बोटीतून अंटार्क्टिका मोहिमेवर जाते. एके काळी समुद्रबंदीच्या बेडीने आपल्या समाजाला जखडून ठेवले होते, याचे आज आश्चर्य वाटेल. तो काळ आता मागे पडला आहे. मात्र डॉ. गायत्री आणि डॉ. गुरुदास हर्षे यांनी इत

Recommended